आत्मनिर्भर सखी: एका नवउद्योजिकेची संकल्प 'सिद्धी'
ही गोष्ट आहे एका तिशीतल्या जिद्दी तरुणीची.जी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पहाते, त्यासाठीचे प्रशिक्षणादी सोपस्कार पूर्ण करते आणि त्या व्यवसायाचा रीतसर अभ्यास करून अवघ्या वर्षभरात आपला उद्योजिका बनण्याचा *'संकल्प'* सिद्धीस नेते. *सिद्धी विनायक फोपळे* हे तिचं नाव,मुळची गोळवण गावची असलेली सिद्धी लग्नानंतर नांदोसच्या फोपळे घराण्यात दाखल होते.अपवादाने नजरेस पडणाऱ्या एकत्रित कुटुंब पद्धतीतलं फोपळ्याचं हे मोठं कुटुंब..गावात शेती,किराणा दुकान आणि इतर छोटे मोठे व्यापार हे या कुटुंबाचे पारंपरिक ..