शेती व पशुधन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आणि तातडीचे असतात. त्यांना वेळेवर योग्य उपाय आणि मदतीची गरज असते. निर्णय घेताना जर विलंब झाला, तर त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर होऊ शकतो. अशाच एका तत्पर निर्णयाचे उदाहरण भगीरथ प्रतिष्ठानच्या कार्यालयात अनुभवायला मिळाले.
म्हारव बंधूंचे अनुभव
म्हारव बंधू हे आडेली गावात दुध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे मुरा जातीच्या म्हशी असून, ते दररोज तीस लिटर दुध गोकुळ दूध संघाला पुरवतात. पशुपालन करताना अनेकदा जनावरांना वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. औशोधोपचार करायचा म्हणलं की गाई, म्हशी एका जागेवर स्थिर उभं राहणं खूप गरजेचं असतं. अशा परिस्थितीत "खोडा" (Travis) अत्यंत उपयोगी ठरतो. म्हारव बंधूंना खोड्याची गरज भासली आणि ते भगीरथ प्रतिष्ठानच्या कार्यालयात आले.भगीरथ प्रतिष्ठानने या शेतकऱ्यांना अवघ्या तीस मिनिटांत खोडा उपलब्ध करून दिला.
ही केवळ एक गोष्ट नव्हे, तर प्रतिष्ठानच्या गतिमान निर्णयक्षमतेचे उदाहरण आहे. जर शेतकऱ्यांना वेळेत सुविधा आणि मदत मिळाली, तर त्यांचा व्यवसाय अधिक सुकर होतो आणि त्यांचा प्रतिष्ठानवरील विश्वास वाढतो. "आपले काम येथे होणारच" हा विश्वासच भगीरथ प्रतिष्ठानच्या कामाची ओळख आहे.
भगीरथ प्रतिष्ठान मध्ये UNDP च्या SGP प्रकल्पांतर्गत 14,000 रुपये किंमत असलेला खोडा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 3,000 रुपये लोकवर्गणी स्वरूपात भरावे लागतात, तसेच वाहतूक खर्चही त्यांनाच उचलावा लागतो.
शेतकरी कष्ट करतो, पण त्याला कुणीतरी "लढ" म्हणणारा लागतो. भगीरथ प्रतिष्ठान हे कार्य समर्थपणे करत आहे!