मे महिना जवळ आला की पाणी बाणी सुरू होते.
परवा असाच ज्ञानेश्वर भोई, एक तरुण दूध उत्पादक, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये आला. "पाणी कमी पडतं, म्हणून चारा पिकवता येत नाही," अशी त्याची अडचण होती.
कुणीतरी कधीतरी म्हटलं होतं – “पाणी असणारे आणि नसणारे – फक्त हेच दोन खरे गट!”
आम्ही त्याला विचारलं, "तुला वाटतं कुठे पाणी मिळेल?" "डुरा मारू, प्रयत्न करू. JCB चे ₹१०,००० भगीरथ प्रतिष्ठान देईल," असं आश्वासन दिलं.
आणि काल दुपारीच फोटो आला – सहा फुटांवर पाणी सापडलं! बास, उत्तर सापडलं...
खरंच, उत्तर नेहमी जवळच असतं – फक्त शोधायला हवं. अडचणीत अडकवतं ती अपयशाची भीती, ती अनामिक पण ठोस असते...
काल ज्ञानेश्वर म्हणाला, "आता दिशा सापडली आहे!"
आता पुढचं पाऊल – भगीरथ प्रतिष्ठान मार्फत जिल्हा बँकेतून कर्ज मिळणार आहे. मे अखेरपर्यंत विहीर पूर्ण होईल.
भगीरथ गंगा अशीच रोज वाहत असते... जगणं आनंददायी करत, शेतीसोबत आनंदाचे मळेही बहरू लागतात.