ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती बरोबरच कोंबडी, शेळी आणि दुध व्यवसाय यावर चालते. यातून रोख पैसे मिळतात. सामाजिक कामे ही विज्ञान आधारित असली पाहिजेत.
स्थानिक शेळ्यांच्या कळपामध्ये वंश सुधारणा व्हावी यासाठी शेळीपालकांना चांगल्या वंशावळीतील नर आम्ही योजनेतून देतो. मुख्यतः अश्या नरांपासून तयार झालेल्या पिल्लांमंध्ये वजन वाढीचा वेग चांगला राहतो. एकूणच खाद्य व वजनाचे गुणोत्तर जुळते आणि शेळीपालकाला योग्य नफा करून घेण्याची शक्यता वाढते. याला शास्त्रीय परिभाषेत FCR म्हणतात. Feed conversion ratio.
शेतकरी जर ज्ञानी झाला तर तो या स्पर्धेच्या युगात टिकेल. त्याला फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.