भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, Metrohm CSR, रोटरी, आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण २५ इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड शाळांना प्रदान करण्यात आले.

30 Mar 2025 09:44:07

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, Metrohm CSR, रोटरी, आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण २५ इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड शाळांना प्रदान करण्यात आले. प्रत्येक बोर्डाची किंमत ₹१,१५,००० आहे.


Digital Screen1 

बेंजामिन फ्रँक्लिन यांनी म्हटले होते – "Investment in education pays the best interest." शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक सर्वात मोठे फळ देते, हे या उपक्रमातून सिद्ध होते.

भगीरथ प्रतिष्ठानने आतापर्यंत १५० स्मार्ट टीव्ही शाळांना उपलब्ध करून दिले आहेत. दृक-श्राव्य माध्यमांच्या मदतीने मुलांना शिकवलेले विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. मूलभूत संकल्पना समजल्या तर पुढील शिक्षणाची वाटचाल अधिक सुलभ होते.

हा उपक्रम ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे!


Digital Screen2 
Powered By Sangraha 9.0