मांडकुली गावात प्राज CSR योजनेतून सहा शेतकऱ्यांना सूर्यफुलाचे बियाणे देण्यात आले.

23 Mar 2025 07:32:20

कोकणात सूर्यफूल शेती तुलनेने कमी केली जाते, पण यासारखे प्रयोग शेतकऱ्यांना नवीन संधी आणि अनुभव देतात. त्याच दृष्टीने मांडकुली गावात प्राज CSR योजनेतून सहा शेतकऱ्यांना सूर्यफुलाचे बियाणे देण्यात आले.


Suryaful

त्यापैकीच गौरी खवणेकर यांनी केलेला यशस्वी प्रयोग म्हणजेच कोकणात सूर्यफुलाची शेती शक्य आहे आणि भविष्यात अधिक शेतकरी याकडे वळू शकतात.

सूर्यफूल पीक कमी कालावधीत तयार होते आणि त्याचे तेलही बाजारात चांगल्या दराने विकले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. पुढील वर्षी यामध्ये आणखी शेतकरी सहभागी होतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Powered By Sangraha 9.0