चौकुळ गावामधील चुरनीची मूस वाडीतील २२ घरे बायोगॅसमुळे झाली धूरमुक्त

    
|

Biogas 1 

            रोटरी क्लब सावंतवाडी, ग्रामपंचायत चौकुळ व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातून गाव चौकुळ येथील चुरनीची मूस या वाडीमध्ये २२ बायोगॅस बांधून पूर्ण झाले आहेत. या सर्वांनी बायोगॅसला शौचालयही जोडले आहे. शौचालय बायोगॅसला जोडणे हा समाज प्रबोधनाचा सर्वात कठीण टप्पा असतो. चुरनीची मूस ही वाडी अत्यंत दुर्गम भागात आहे. स्थानिक ग्रामस्थ व शाळेतील मुले यांच्या श्रमातून ही निळ्या ज्योतीची क्रांती घडविली आहे.