पर्यावरणपूरक गणपती आता जनमानसामध्ये रुजत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसला हा पर्याय ठरू शकतो. प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहयोगातून यावर विशेष संशोधन झाले आहे. एकूण ३०० मूर्तीकारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे पर्यावरणपूरक उत्सव रोजगार निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.