गतवर्षी वंशसुधारासाठी स्थानिक शेळीपालकांना ‘शिरोही’ जातीचे नर ५०% अनुदानावर दिले होते. शेळीपालनामध्ये ९ महिन्यामध्ये १८ किलो वजनाचा टप्पा पार पडल्यास आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. विक्री करताना पण अंदाजे वजन सांगण्यापेक्षा काट्यावर मोजलेले वजन अधिक शास्त्रीय ठरते. ‘भगीरथ’ संस्थेकडून एकूण १० शेळीपालकांना प्रायोगिक तत्त्वावर वजनकाटे देण्यात आलेले आहेत.