शाश्वत ग्रामीण आर्थिक विकासाच्या मॉडेलचे ‘भगीरथ’ने केलेले प्रयोग पाहण्यासाठी ही भेट होती. नाबार्ड मुंबईचे DGM श्री. शाजी व AGM श्री. योगेश्वर यांच्या नेतृत्त्वाखाली ही भेट झाली. बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन व निवजे येथील दुध संकलन केंद्र या संदर्भातील माहिती कार्यकर्त्यांकडून त्यांनी जाणून घेतली. निवजेचे श्री. अभय परब व श्री. विठ्ठल शिरसाट यांनी हरियाणा येथून आणलेल्या मुऱ्हा जातीच्या जनावरांचे अनुभव यावेळी कथन केले.