हुमरस गावातील आजीची हळद
शेती ही संस्कृती आहे, असे म्हटले जाते. श्रमातून निर्माण होणाऱ्या संपत्ती निर्मितीच्या वेडाला वयाची मर्यादा नसते. ७२ वर्षाची आजी श्रीम. सत्यभामा साबाजी नाईक व तिची नात यांनी ५ वर्षांपूर्वी हळद लागवडीला सुरुवात केली होती. सेलम जातीची सुधारित हळद व सेंद्रिय खते यांचा परिणाम म्हणून स्वत:पुरती हळद तयार होऊ लागली. आजीला यावर्षी एकूण ६ किलो हळद पावडरचे उत्पन्न मिळाले. स्वत:च्या घरापुरती हळद पावडर ठेवून उर्वरित हळद पावडर स्थानिक बाजारपेठेमध्ये तिने सहजपणे विकली.