ग्रामपंचायत आंबेगाव व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहयोगातून एक महिन्याचे ‘शिवणकाम प्रशिक्षण’ पूर्ण झाले. सौ. मनिषा हरमलकर-कासार यांनी या सर्व महिलांना अत्यंत आपुलकीने शिवणकाम शिकविले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकूण १७ महिलांना शिवणयंत्र घेण्यासाठी मदत करण्यात आली. एका मशिनची किंमत रु. ६,८००/- होती. या प्रत्येक महिलेला ‘भगीरथ’ने रु. २,०००/- प्रमाणे मदत केली. गावाचे भौगोलिक स्थान दुर्गम असल्यामुळे कपडे शिवण्यासाठी शहरामध्ये यावे लागायचे, आता प्रशिक्षणानंतर स्वयंपूर्णतेचा मंत्र व तंत्र महिलांना अवगत झाला आहे.