संतोष गोंधळेकर यांचे ‘झोपले अजून माळ’ या नावाचे पुस्तक आहे. पाण्याचा सुयोग्य वापर व श्रमशक्ती यांच्या संयोगातून उत्पन्न निर्मिती करणारे ‘हात’ खूप मह्त्त्वाचे असतात. गाव न्हावेली, नागझरवाडी येथील युवकांनी नोकरीसोबतच समूह शेतीचा प्रयोग केला आहे. भोपळा, हळद यांची लागवड केली आहे. ‘कोविड’नंतर एकूणच शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पडीक जमिनी अशाप्रकारे लागवडीखाली आल्या तर, अन्नसुरक्षेबरोबरच रोजगार निर्मितीही होईल. ‘झोपलेले माळ’ अशाप्रकारे जागे होणं हा शुभसंकेत आहे.