दि. ८ ऑगस्ट २०२१ रोजी ‘भगीरथ’मध्ये १०३ ‘गुण श्रीमंत’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना एकूण पाच लाख पंधरा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. गेली १२ वर्षे हा उपक्रम सेवा सहयोग (ठाणे), दै. तरुण भारत, आम्ही बॅचलर्स ग्रुप व भगीरथ प्रतिष्ठान हे संयुक्तपणे करत आहेत. आतापर्यंत ६६५ विद्यार्थ्यांना रु. २६,१६,७०८/- शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. कार्यक्रमाला ‘सेवा सहयोग’चे मा. श्री. रवींद्र कर्वे (ठाणे), माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. श्री. वामन तर्फे, मा. श्री. प्रभाकर सावंत, मा. श्री. शेखर सामंत (दै. तरुण भारत), मा. डॉ. रवींद्र जोशी, मा. डॉ. प्रसाद देवधर उपस्थित होते.