सुरण शेती फायद्याची ठरते.

21 Jul 2021 10:37:45

Yam Plantation _1 &n 

         पळसंब गावचे (ता. मालवण) सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी बायोगॅसच्या सोबतीने हळद व सुरण बियाणे ‘भगीरथ’च्या माध्यमातून वितरीत केले होते. सुरणामध्ये गजेंद्र जातीचा सुरण हा चांगला प्रतिसाद देतो. यामधील सुरणाची वाढ नियमित व संतुलित होते. या सुरणामध्ये ऑक्झेलेटचे प्रमाण कमी असल्यामुळे खाल्ल्यावर घशाला खाज कमी येते. ३०० ग्रॅमचा कंद सुरण बियाणे म्हणून लावल्यास १ किग्रॅचा सुरण तयार होतो. याचा बाजारभाव ८०/- रुपये एवढा आहे. सुरण हा पचनसंस्थेसाठी सर्वोत्तम औषध आहे. ‘भगीरथ’ संस्था शेतकऱ्यांसाठी याचे बियाणे पालघर येथून उपलब्ध करते.
 
Powered By Sangraha 9.0