विज्ञान शिकताना वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे हे खूप महत्त्वाचे असते. बरेचदा प्रयोगासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये अडचणी निर्माण होतात. यासाठीच ‘Yes Foundation’ प्रायोजित आणि ‘अनुभूती लर्निंग सोल्युशन्स’ व ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान साहित्याचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० हायस्कूलना केले होते.