‘SRI पद्धतीने भातशेतीचे उत्पन्न केले दुप्पट’

09 Apr 2021 16:02:08


Bhagirath - 1_1 &nbs      पारंपारीक भातशेतीमध्ये प्रती गुंठा भाताचे उत्पन्न ३२ ते ४० किलो एवढे येते. SRI पद्धतीचा अवलंब केल्यामुळे भातशेती उत्पन्नामध्ये प्रती गुंठा ६० ते ८० किलो एवढी वाढ होऊन जास्त उत्पन्न मिळते. फुटव्यांची अधिक संख्या, अधिक दाणे असलेले केसर तसेच भात कापणी करत असताना येणारी सुलभता यामुळे शेतकरी भातशेतीसाठी SRI पद्धत स्वीकारीत आहेत. केळूस गावातील श्रीम. मानसी कुडव, श्रीम. प्रेमलता वेंगुर्लेकर व श्रीम. कविता वेंगुर्लेकर यांनी हा प्रयोग यशस्वीरीत्या केला आहे. या गावातील लोकांचा समूहशेती करण्याकडे कल आहे. जंगलातील माकडांपासून शेतीमध्ये होणारा उपद्रव कमी करण्यासाठी शेतकरी जाळी वापरत आहेत. सोलार कंपाऊंडचा वापर करण्यासाठी त्यांना ‘भगीरथ’ संस्था मदत करणार आहे. दाडोबा मंदिरामध्ये दरमहिन्याला शेतकऱ्यांची मिटींग घेण्याचे ठरले. या मिटींगमध्ये शेतीच्या प्रश्नांची चर्चा करण्यात येईल.
Bhagirath - 2_1 &nbs

Powered By Sangraha 9.0