समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचा ‘श्री गणेशा’ सुरु

25 Jan 2021 11:35:32


Bhagirath - 1_1 &nbs     दिनांक १८/०१/२०२१ ते २०/०१/२०२१ या कालावधीमध्ये ‘देसाई डेअरी फार्म, माडखोल’ येथे दुग्धव्यवसाय, चारापिक लागवड व वासरू संगोपन यासंबंधीचे निवासी प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणामध्ये एकूण १४ शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. पहाटे ३.३० वाजल्यापासून ते सकाळी १०.०० यावेळेमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव घेऊन; दुपारच्या व सायंकाळच्या सत्रामध्ये एकूण ४ तज्ञ लोकांचे मार्गदर्शन व झालेली गटचर्चा, यामुळे ‘गुरुकुल’ पद्धतीचा हा पॅटर्न अधिक यशस्वी झाला. दुग्धव्यवसायाचे पुढील प्रशिक्षण हे दिनांक २७/०१/२०२१ ते २९/०१/२०२१ या कालावधीमध्ये माडखोल येथे होणार आहे (याची पूर्व नोंदणी श्री. विकास धुरी - ९२८४५१५९११ यांच्याकडे करणे आवश्यक आहे). प्रशिक्षणानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रती शेतकरी रुपये २ लाख कर्ज पुरवठा करणार आहे.

Bhagirath - 2_1 &nbs              या प्रशिक्षण शिबिरामध्ये डॉ. विद्यानंद देसाई (पशुधन विकास अधिकारी, वेंगुर्ला), डॉ. विष्णू कविटकर (पशुतज्ञ, पशुपैदास केंद्र निळेली), श्री. ज्ञानेश्वर सावंत-फोंडेकर (दुग्धव्यावसायिक), श्री. ओंकार सावंत (कृत्रिम गर्भरेतक), श्री. धनंजय गोळम (शेतीतज्ञ), श्री. संतोष कुडतरकर (पशुतज्ञ), डॉ. मधुकर घारपुरे (माजी पशुधन विकास अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमादरम्यान श्री. अनिरुद्ध देसाई (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक), श्री. प्रभाकर देसाई (देसाई डेअरी फार्म, माडखोल), श्री. रवींद्र प्रभूदेसाई (निवृत्त शाखाधिकारी, बँक ऑफ इंडिया), व डॉ. प्रसाद देवधर (अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान) हे उपस्थित होते.
Bhagirath - 3_1 &nbs
Powered By Sangraha 9.0