मठ-वेंगुर्ला (परबवाडी) येथील श्री. भूषण पंढरीनाथ बांबार्डेकर हे दोन वर्षांपूर्वी मुंबई सोडून गावी आले होते. दोडकी, पडवळ, कार्ली, भेंडी यांसोबतच ‘इंडिका - ऑरेंज व यलो’ या प्रकारच्या झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. वेंगुर्ल्यातील फुलांच्या बाजारपेठेमध्ये याची विक्रीव्यवस्था उपलब्ध आहे. सेंद्रिय पद्धतीची औषध फवारणी करण्यासाठी ‘भगीरथ’ संस्थेने त्यांना फवारणी पंप दिल्यामुळे कमी डोसामध्ये पण सर्वत्र औषध पोहोचवणे सुलभ झाले आहे.