‘SRI’ ला ‘कोनोव्हिडर’ची जोड

20 Jul 2020 17:04:29


Bhagirath - 1 _1 &nb      भात शेतीमध्ये चारसूत्री भात, जपानी पद्धतीची लावणी याचबरोबर गेल्या २ वर्षांपासून भात लागवडीची ‘
SRI’ पद्धत कोकणामधील शेतकऱ्याने स्वीकारली आहे. ‘मॅट पद्धती’ने केलेली रोपवाटीका व २५ x २५ सें.मी. अंतरावर केलेली नियंत्रित लावणी हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. पारंपारिक भात लागवडीमध्ये २१व्या दिवशी रोपे लावली जातात, तर SRI मध्ये १५ दिवसांच्या आत लावणी केली जाते. दोन रेषेमधील कोळपणी करण्यासाठी फोटोमध्ये दिसणारा ‘कोनोव्हिडर’ (कोळपणीयंत्र) पूर्वी हरीयाणा वरुन यायचा, पण आता माणगाव (ता. कुडाळ) मधील एका फॅब्रीकेटर्सकडे कोनोव्हिडर बनविला जातो. लोकांनी हे यंत्र वापरावे म्हणून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आर्थिक मदत करते. पारंपारिक भात लागवडीमध्ये उत्पादन हे गुंठयाला ४५ कि.ग्रॅ. मिळते, तर SRI पद्धतीमध्ये हेच उत्पादन ८० कि.ग्रॅ. पर्यंत मिळते. योग्य बियाण्याची निवड, नियंत्रित लावणी व पाण्याचे व्यवस्थापन यामुळे उत्पादन क्षमता आणि उत्पादकता यामधील फरक कमी होत आहे.
Bhagirath - 2_1 &nbs

Powered By Sangraha 9.0