“गड्या आपुला गाव बरा...” हे म्हणणे वास्तवामध्ये आणण्यासाठी नियोजन, प्रशिक्षण, बँक व स्वत:च्या पायावर उभं राहण्याची तीव्र इच्छाशक्ती लागते. रोजगाराचे असे अनेक मार्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये आलेल्या चाकरमान्यांनी निवडण्याची गरज आहे. कट्टा (तालुका मालवण) या गावातील सौ. सिद्धी विनायक फोपळे या महिलेने लेयर कुक्कुटपालन करून उद्योजकतेचा नवा मंत्र साऱ्यांना दिला आहे.