II आम्ही बायोगॅस बांधतो II

15 Dec 2020 12:52:52


Bhagirath - 1_1 &nbs

             मा. अण्णा हजारे यांनी नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी व श्रमदान अशी ग्रामविकासाची पंचसूत्री सांगितलेली आहे. बायोगॅसमुळे कुऱ्हाडबंदी होते. जंगलामधील मानवाचा अनावश्यक होणारा हस्तक्षेप कमी करायचा असेल, तर घरगुती इंधनाला पारंपारिक चूल, बायोगॅस व LPG सिलेंडर असे ३ पर्याय उरतात. या तिघांमध्ये ‘बायोगॅस’मधून मिळणारे स्वच्छ इंधन हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरते. ५ माणसांच्या कुटुंबाला साधारणतः १ महिन्याला १ सिलेंडर लागतो, तर एका जनावराच्या शेणावर ३ माणसांचा स्वयंपाक बायोगॅसवर होतो. बायोगॅस बांधण्यासाठी ‘सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ ही UPNRM प्रकल्पांतर्गत ‘भगीरथ’च्या शिफारशीवर २०,०००/- रुपयांचे कर्ज शेतकऱ्याला देते. आत्तापर्यंत ८,५०० बायोगॅस ‘भगीरथ’च्या गवंड्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधले आहेत. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समित्या व सरपंच या सर्वांच्या सहयोगातून धूरमुक्त जिल्ह्याचे स्वप्न हे आता एका नजरेच्या टप्प्यात आले आहे. या साऱ्या कामाचा आधारवड म्हणजे ‘भगीरथ’सोबत काम करणारे गवंडी व त्यांचे मदतनीस होय. फोटोमधील ‘टी-शर्ट’ हे त्यांच्यासाठीच बनविले आहे. आपल्या सभोवतालच्या हिरव्यागार निसर्गाचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. ‘आम्ही बायोगॅस बांधतो’ या ३ शब्दांमध्ये जागतिक तापमान वाढीला गाव पातळीवर उत्तर देण्याची क्षमता आहे. या साऱ्या भगीरथ प्रयत्नांना कार्बन ट्रेडिंगची साथ मिळाल्यास जागतिक अर्थशास्त्राशी व तापमान वाढ या समस्येची उत्तरे शोधण्यासाठी गावातला सामान्य शेतकरी जोडला जाईल.
Powered By Sangraha 9.0