@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ कुक्कुटपालनातील आयडॉल – श्री. सदाशिव माने.

कुक्कुटपालनातील आयडॉल – श्री. सदाशिव माने.

बायोगॅस, शेतीसाठी बैल, दुधासाठी गाय, गांडूळ खत व जोडीला कुक्कुटपालन यामुळे आर्थिक चक्र स्थिरावते. एकाच पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा शेती व जोडीला असणारे कुक्कुटपालनासारखे पूरक उद्योग शेतकऱ्याचे अर्थशास्त्र सुधारतात. सध्याच्या परिभाषेमध्ये याला ‘Circular Economy’ म्हणतात. या प्रकारच्या आर्थिक विकासामध्ये अधिक शाश्वतता असते.

 

आकेरी गावातील श्री. सदाशिव माने यांनी कुक्कुटपालन प्रशिक्षणानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे. कावेरी जातीचे पक्षी अंडी व मांस उत्पादनासाठी किफायतशीर ठरत आहेत. अर्धबंदिस्त प्रकारे पक्षी पाळल्यामुळे व्यवस्थापन खर्च कमी झाला आहे. श्री. सदाशिव मानेंचे घर रस्त्यालगत आहे, त्यामुळे विक्री व्यवस्थाही चांगली आहे. एका पक्षामागे सरासरी ७० ते ८० रुपये नफा होत आहे.