सह्याद्रीच्या डोंगर रांगातील निवजे गावामध्ये नाबार्डच्या UPNRM (नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन) या प्रकल्पातून १०९ बायोगॅस झाले. जिल्हा बँकेमध्ये बायोगॅसमुळे येथील शेतकऱ्यांची पत निर्माण झाली होती. त्यामुळे नवीन दुधाळ जनावरांसाठीचा कर्ज पुरवठा बँकेकडून सुलभतेने झाला.
गोकुळचे दुध संकलन केंद्र सुरु करण्यासाठी ‘भगीरथ’ने गावकऱ्यांना मदत केली. फॅट व SNF परीक्षणासाठी मशीन व लॅपटॉप दिल्यामुळे दुधाची प्रत सुधारली. गेल्या वर्षभरामध्ये एकूण १० लाखांचे उत्पन्न दुधातून शेतकऱ्यांना मिळाले.
श्री. दत्तात्रय सावंत, श्री. अभय परब, श्री. संतोष पिंगुळकर यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाकडे ८० लाखांचा समूहशेती सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे. बायोगॅस हा विकास प्रकल्पांचा श्री गणेशा ठरत आहे.