प्रयोगशील शिक्षक श्री. संदिप साळसकर यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केलेली कलासाधना

23 Mar 2019 16:03:32

 

      गावातील शाळा हे समाज परिवर्तनाचे, नवचैतन्याचे, सृजनाचे केंद्र असते. पुढील कलाकृती शाळेतील मुला-मुलींनी केल्या आहेत. कोकणातील समृद्ध निसर्ग कुंचल्यातून प्रकट झाला आहे.
 
 
      श्री. संदिप साळसकरांना भेटल्यावर पु. ल. देशपांडेंच्या चितळे मास्तरांची आठवण झाली. शिक्षण म्हणजे केवळ एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेमध्ये जाणे नव्हे, तर जीवनामध्ये विविध रंग योग्य ठिकाणी योग्य वेळी भरणे म्हणजे खरे जीवन शिक्षण ठरते.
 
 
 
      रांगोळी, चित्रकला, शिल्पकला, कथ्थक, वादन, गायनाचे वर्ग या शाळेमध्ये चालतात. असे शिक्षक व शाळा समाज जीवन अधिक समृद्ध करत असतात.
 
 
 
Powered By Sangraha 9.0