@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ हिवाळे गावातील ग्रामस्थांनी केला, 'धुरमुक्त वस्तीचा श्रीगणेशा'

हिवाळे गावातील ग्रामस्थांनी केला, 'धुरमुक्त वस्तीचा श्रीगणेशा'

 

हिवाळे गावातील (ता. मालवण) धनगर वस्तीमधील महिलांना इंधनासाठी जंगलावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे होणारी वृक्षतोड, घरातील धूर व आरोग्याच्या समस्या यावर बायोगॅस प्रभावी ठरू शकतो. याचा विचार- विनिमय करण्यासाठी येथे वाडीबैठक झाली. पंचायत समिती मालवणचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. संजय गोसावी, कृषी विकास अधिकारी श्री. व्ही. के. जाधव व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. UPNRM–2 प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास २०,०००/- रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.