‘Mass Production Vs Production by Masses’ याचा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस या गावामध्ये साकारत आहे. ‘अंड्याचा गाव’ ही संकल्पना येथे रूजते आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोज ५० हजार अंडी बाहेरून (कर्नाटकहून) येतात. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (कर्ज), भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान (प्रशिक्षण) यांच्या सहयोगातून व व्यंकटेशा हॅचरीच्या मार्गदर्शनाखाली लेयर पक्षांचे संगोपन क्लस्टर पध्दतीने करण्याचे ठरले. सदर योजनेचे उद्घाटन दिनांक २२ एप्रिल २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री मा. श्री. नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
BV 330 या जातीचे हे पक्षी आहेत. एका शेतकऱ्याकडे ३०० ते ५०० पक्षी व अशा ५० हजार पक्षांचा ५ गावातील एक समूह असे या योजनेचे स्वरूप आहे. श्री. दिनेश म्हाडगुत यांनी विक्री व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे.