बिबवणे (मांगलेवाडी), ता. कुडाळ येथील शेतकरी श्री. विजय सावंत यांनी सातारा येथे वराहपालन प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी पिगरीतील खताचा उपयोग नाचणी, मका या पिकांसाठी केला आहे. दरवर्षी विविध प्रकारचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात करून कुडाळ शहरात तो विकतात. बायोगॅस, गांडूळ खत, वराहपालन, सुधारित पद्धतीने शेती असे विविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. संस्थेच्या सहकार्यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे.