Interactive Digital Board कसे वापरावे ह्यासाठी प्रशिक्षण शिबीर

    
|

Interactive Digital Board कसे वापरावे ह्यासाठी प्रशिक्षण शिबीर

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व Metrohm CSR यांच्या संयुक्त प्रयत्नातून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 30 शाळांना Interactive Digital Board प्रदान करण्यात आले आहेत.

1 लाख 15 हजार रुपये किंमतीचा हा डिजिटल बोर्ड म्हणजे शिक्षणातली एक जादूच – विज्ञान, गणित, भूगोल, भूमिती इत्यादी विषय एका क्लिकवर विद्यार्थ्यांसमोर सुस्पष्टपणे सादर करता येतात.


Digital Board Training 

मात्र, केवळ साधन उपलब्ध करून देणे पुरेसे नाही. या साधनांचा प्रभावी वापर शिक्षणात कसा करायचा याचे प्रशिक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळेच आज 8 शाळांमधील 50 शिक्षकांसाठी खास प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात Metrohm CSR चे प्रमुख मा. श्री. दीपक परब आणि रोटरी क्लबचे Dr. विद्याधर तायशेट्टे यांचे विशेष योगदान असून, त्यांच्यामुळेच हे शक्य झाले. भविष्यात असे प्रशिक्षण नियमितपणे घेता यावे यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) पार्श्वभूमीवर असे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत. प्रशिक्षण सत्राला प्रभाकर सावंत, प्रसाद देवधर, उत्तम मळगावकर यांची विशेष उपस्थिती होती.