लोकसहभागातून ग्रामविकासाचे नवीन पायंडे.

    
|

लोकसहभागातून ग्रामविकासाचे नवीन पायंडे.

1 एप्रिल हा साधारणतः विनोद आणि खोडसाळपणाचा दिवस म्हणून ओळखला जातो, मात्र भगीरथ प्रतिष्ठान साठी हा दिवस समाजहितासाठी एक वेगळाच आदर्श घेऊन आला.


Waterpump 

ह्यादीवशी रोटरी सिंधुदुर्ग, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि वराड ग्रामस्थांनी एकत्र येत शेतीसाठी पंप आणि पाईप बसवण्याची योजना आखली. तसेच, एका वस्तीला आवश्यक असलेल्या विहिरीसाठी संकल्प करण्यात आला.

त्याच बरोबर, संध्याकाळी वेताळ बांबर्डे गावात झालेल्या एका विशेष उपक्रमात श्रमदान, लोकवर्गणी आणि प्रतिष्ठानच्या सहकार्यातून हातेरी नदीवरील पंप बसवण्यात आला. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी 45,000 रुपयांची वर्गणी तर भगीरथ प्रतिष्ठानने 35,000 रुपयांची मदत केली. या एकूण प्रयत्नांमुळे गावाला शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला.

या योजनेमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. "लोकसहभाग असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही"

 
या उपक्रमाने दाखवून दिले की 1 एप्रिल मजा, मस्तीचा दिवस असू शकतो, पण तो समाजबांधवांसाठी विश्वास आणि विकासाचा दिवसही ठरू शकतो.