माणगाव प्रभागातील अंगणवाडीतील, सरासरी पेक्षा कमी वजन असलेल्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

    
|
दिनांक ९मार्च २०२५ रोजी, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान मार्फत, माणगाव प्रभागातील अंगणवाडीतील, सरासरी पेक्षा कमी वजन असलेल्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण 27 विद्यार्थी सहभागी झाले. मुलांचे आरोग्य तपासून त्यांना योग्य आहार सल्ला व औषध वितरण करण्यात आले.

Poshan shibir
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, महाराष्ट्रात अद्यापही सामान्य वजनाच्या तुलनेत कमी वजनाची, ठेंगणी वाढ (stunting), आणि कृशपणा (wasting) असलेली मुले मोठ्या प्रमाणावर आहेत. ग्रामीण भागात गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि योग्य आहाराच्या माहितीचा अभाव यामुळे समस्या अधिक गंभीर आहे.

Poshan shibir 
ह्या परिस्थिती वर मात करण्यासाठी स्थानिक लोकसहभाग, पोषण जागरूकता, आणि आहाराच्या चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे.
त्याच अनुषंगाने, संस्थेच्या या उपक्रमामुळे, कमी वजन असलेल्या मुलांच्या पौष्टिक आहाराकडे लक्ष दिले जाईल आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.