दुधवाढीसाठी सामंजस्य करार कार्यक्रम

    
|
MOU

         सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुध उत्पादन वाढीच्या संकल्पाचा श्वेतसंवाद दि. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आला. सध्याचे दुध संकलन प्रती दिन २८ हजार लिटर आहे. गतवर्षापेक्षा यावर्षी १० हजार लिटरने दुध वाढीमध्ये वृद्धी झाली आहे. गोठा बांधणी, मुक्तगोठा, बायोगॅस व मुऱ्हा म्हैशी आणणे या सर्व प्रकल्पातील बाबी पूर्ण करण्यासाठी टीमवर्कची गरज आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, गोकुळ दुधसंघ कोल्हापूर व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यामध्ये सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.