![Madhumakshikapalan 1 Madhumakshikapalan 1](https://www.bhagirathgram.org/Encyc/2022/4/9/IMG-20220405-WA0032_202204091533497676_H@@IGHT_662_W@@IDTH_589.jpg)
परागीभवन हे फळधारणेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी मधुमक्षिकापालन संरक्षण व संवर्धनासाठी ‘भगीरथ’चे कार्यकर्ते श्री. नारायण चेंदवणकर (मोबा.९७६४२४४९४७) कार्यरत आहेत. मुळदे येथील शेतीविद्यालयामध्ये प्रात्यक्षिकासाठी ते नेहमी जातात. रानातील मधाच्या पोळ्यांपासून मधमाशांना कोणत्याही प्रकारची इजा न होता मधसंकलन मह्त्त्वाचे असते. शेतकऱ्यांना मधुमक्षिकेच्या पेट्या देणे, कॉलनी सेट करणे व शेतकरी मेळाव्यामध्ये मधुमक्षिकापालनसंबंधी प्रबोधन करणे या कामामध्ये नारायण हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.