‘अझोला’ हे एक प्रकारचे शेवाळ असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘Azolla pinnata’ हे आहे. ८ इंच खोल व ५ x १४ फुट खड्ड्यामध्ये प्लास्टिक आच्छादून केलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये ते वाढते. त्याच्या वाढीसाठी, पोषणद्रव्ये मिळण्यासाठी ताजे शेण, माती, खनिजद्रव्ये व सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये टाकले जाते. आठवड्यातून २ वेळा अझोला काढता येते. त्याच्या वाढीचा वेग उत्तम असल्यामुळे ५०% सूर्यप्रकाशामध्ये चांगले उत्पन्न मिळते. दुधाळ जनावरे, अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्या यांसाठी हे उत्तम प्रकारचे खाद्य आहे. यामधील प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० % एवढे आहे. अंड्यातील पिवळा बलक व दुधाळ जनावरांचे फॅट यामुळे वाढते.