कोणत्याही प्रकल्पाची शाश्वतता ही कौशल्य विकासावर अवलंबून असते. काही कौशल्ये ही अंगभूत असतात, तर काही कौशल्यांचा विकास हा प्रत्यक्ष काम करता करताच होतो. ‘भगीरथ’मध्ये गेली १० वर्षे बायोगॅस बांधकाम करणारे श्री. जगदीश गावडे, या गवंड्याचा मुलगा कु. यतीन गावडे हा इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. फावल्या वेळेमध्ये तोही बायोगॅस बांधकाम शिकण्यासाठी जातो. एका अर्थाने हे गुरुकूल पद्धतीचे प्रशिक्षण आहे. शाळेमध्ये शिकता शिकताच अशाप्रकारे केलेले काम हे गणित, भूमिती, विज्ञान या सर्व अभ्यासक्रमातील विषयांना पोषक असते. पुढच्या काळामध्ये मी काय शिकलो ? या सोबतच मला काय करता येते ?, ज्यातून स्वतःची उपजीविका सुरु करता येईल. हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. ‘हात व मेंदू’ यांच्या समन्वयाने माणूस अधिक प्रगतीकडे गेला आहे. कु. यतीन जगदीश गावडे याचे मनःपूर्वक अभिनंदन !