महात्मा गांधींनी स्वच्छता आणि सत्यामध्ये परमेश्वर दर्शन होते असे मानले व त्याप्रमाणे वर्तन केले. स्वच्छ व शुद्ध पाणी हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. सावंतवाडी नगरपालिका, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, रोटरी क्लब व क्रेडाई यांच्या सहकार्याने सावंतवाडी शहरातील सोसायटींमधील पाणी साठवणुक टाक्या वर्षातून दोनदा साफ करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. लाखे वस्तीमधील श्री. विजय लाखे व श्री. दीपक लाखे यांनी पुणे येथे जाऊन २ दिवसांचे टाक्या साफ करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांना लागणारे साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पाण्याची स्वच्छता व शुद्धता या दोन गोष्टी ‘चकाचक’मुळे शक्य होतील. सावंतवाडीचे नगराध्यक्ष श्री. संजू परब, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत जावडेकर, रोटरीचे डॉ. राजेश नवांगुळ, क्रेडाईचे श्री. शरद सावंत व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांच्या उपस्थितीत साहित्य हस्तांतरीत करण्यात आले. नगरपालिका प्रशासन टाकी साफ करण्याचे दरपत्रक ठरविणार आहे.