‘निवजेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. निवजे’ ही संस्था निवजे गावामध्ये ‘गोकुळ दुधसंघा’चे दुधसंकलन केंद्र चालवते. एकूण ३६ शेतकऱ्यांना रुपये ७५ हजार एवढ्या बोनसचे वाटप झाले. श्रीम. मेरी बेनिट डिसोझा यांना सर्वाधिक बोनस रु. ६,२०१/- मिळाला. मुरघास (सायलेज) अधिक प्रमाणात करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. गतवर्षी १५ टन सायलेज या गावामध्ये भगीरथ प्रतिष्ठान व डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले होते.