काल ‘भगीरथ’च्या कार्यालयामध्ये आकाशकंदील स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. निसर्गामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर करून मुलांनी आकाश कंदील बनविले. आकाशकंदील स्पर्धेमध्ये श्री. जनार्दन खोत व श्री. बाळ पालव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मुलांनी आकाशकंदील बनवताना त्याची रंगसंगती कशी असावी, कोणते पर्यावरणपूरक साहित्य वापरावे, आकार कोणता असावा यासाठी ‘आकाशकंदील कसा असावा’ या विषयाची एकदिवशीय कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे.