Enter your Email Address to subscribe to our newsletters
दिनांक १८/०१/२०२१ ते २०/०१/२०२१ या कालावधीमध्ये ‘देसाई डेअरी फार्म, माडखोल’ येथे दुग्धव्यवसाय, चारापिक लागवड व वासरू संगोपन यासंबंधीचे निवासी प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणामध्ये एकूण १४ शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. पहाटे ३.३० वाजल्यापासून ते सकाळी १०.०० यावेळेमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव घेऊन; दुपारच्या व सायंकाळच्या सत्रामध्ये एकूण ४ तज्ञ लोकांचे मार्गदर्शन व झालेली गटचर्चा, यामुळे ‘गुरुकुल’ पद्धतीचा हा पॅटर्न अधिक यशस्वी झाला. दुग्धव्यवसायाचे पुढील प्रशिक्षण हे दिनांक २७/०१/२०२१ ते २९/०१/२०२१ या कालावधीमध्ये माडखोल येथे होणार आहे (याची पूर्व नोंदणी श्री. विकास धुरी - ९२८४५१५९११ यांच्याकडे करणे आवश्यक आहे). प्रशिक्षणानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रती शेतकरी रुपये २ लाख कर्ज पुरवठा करणार आहे.