मन प्रज्ज्वलित करणारा ‘बायोगॅस’

    
|

रेडी गावातील श्री. अशोक अंकुश आडेलकर या शेतकऱ्याचे घर म्हणजे शेतीची प्रयोगशाळा आहे. खारफुटीचे जंगल व त्याला लागून असलेल्या तेरेखोलच्या खाडी किनारी श्री. अशोक आडेलकर राहतात. गोपालन, बायोगॅस, गांडूळखत, कुक्कुटपालन, खेकडापालन यांसारखे शृंखला उद्योग त्यांनी उभे केले आहेत. ‘भगीरथ’चे गवंडी श्री. अर्जुन सावंत यांनी त्यांचा बायोगॅस बांधला. बायोगॅस बांधणारा प्रत्येक गवंडी हा शेतकरी समूहाला ‘बायोगॅसच्या स्लरी’चा उपयोग नेहमीच सांगत असतो. बायोगॅसच्या स्लरीपासून गांडूळ खत, नाडेप, कंपोस्ट हे सारे तयार केल्यावर शेतकरी खताच्या बाबतीमध्ये इंधनाबरोबरच (बायोगॅस मिथेन) स्वयंपूर्ण होऊ शकतो.
Biogas 1_1  H x

श्री. आडेलकर यांच्याकडील गाईचे दूध सध्या ४० ते ४५ रुपये लिटर या दराने गावामध्ये विकत घेतले जाते. ‘उमेद अभियाना’ची वैशिष्ट्यपूर्ण ‘परसबागेतील पोषणबाग’ या प्रयोगशील शेतकऱ्याने केली आहे. येथे ‘कृषी पर्यटन केंद्र’ सुरू करण्याचा मानस आहे. श्री. आडेलकर यांचा मुलगा व मुलगी या दोघांनाही असलेली संगीताची आवड व त्या अनुषंगाने मिळालेले प्रशिक्षण या साऱ्याची नादमयता या परीसरामध्ये जाणवते. ‘बायोगॅस’ हा केवळ ज्वलनशील नाही तर माणसाचे मन प्रज्ज्वलित करण्याचे कामही करतो, हे कालच्या श्री. अंकुश आडेलकर यांच्या भेटीमधून समजले.
Biogas 2_1  H x

रेडी गावातील ‘भगीरथ’च्या कार्यकर्त्या नमिता खेडेकर यांनी रेडी व आजूबाजूच्या गावांमध्ये (आरवली, शिरोडा) बायोगॅस अधिक लोकांपर्यंत पोचवला.
Biogas 3_1  H x