मनुष्यबळाला यंत्राची साथ

    
|

भात लावणीचे काम सुरू असताना श्रम जाणवू नयेत म्हणून पारंपारिक गाणी म्हणण्याच्या पद्धती अजूनही गावांमध्ये चालू आहेत. मात्र फरक एवढाच पडलाय की, भात लावणी यंत्राच्या आधुनिकतेचे गाणे शेतमळ्यामध्ये ऐकू येत आहे. एक एकरची लावणी करण्यासाठी ४ ते ५ दिवसांचा वेळ हा मनुष्यबळाला (६-७ जण) लागतो, पण ‘यानमार’ या कंपनीचे लावणी यंत्र हेच काम अवघ्या ४ तासात पूर्ण करते. या लावणी यंत्राची किंमत ही साधारणपणे रु. २.७५ लाख एवढी आहे. कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेमधून श्री. शरद धुरी या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमधील यांत्रिकीकरणाप्रमाणे लागवडीखालील क्षेत्र वाढविले आहे. एकूण ३० एकर भात शेती ते यंत्राद्वारे करतात.