२७ उणे ९ किती? असा प्रश्न अकबरने बिरबलाला विचारला होता. बिरबल हा हुशार असल्यामुळे हा अंकगणिताचा प्रश्न नाही, तर निसर्गचक्राचा प्रश्न आहे हे त्याला समजले. म्हणून तो उत्तर देतो, ‘२७ उणे ९ = ०’. २७ नक्षत्रांपैकी पावसाची ९ नक्षत्र जर पडली नाहीत तर शेतीवर आधारित अर्थव्यवस्था कोलमडते.
फोटोतील श्री. रामदास वामन नाईक (गाव न्हावेली, ता. सावंतवाडी) यांना बैल खरेदीसाठी ‘भगीरथ’ने तातडीने १५ हजार रुपयांची मदत केल्यामुळे त्यांना शेती करणे सुलभ झाले. ६ महिन्याने ते पैसे परतही करतील. मदत किती ते महत्त्वाचे नसते, तर ती योग्य वेळी मिळणे महत्त्वाचे असते. कोकणामधील भातशेतीच्या खाचरांची रचना पहाता बैलाची जोडी ही अधिक कार्यक्षमतेने काम करते. अकबर आणि बिरबल यांची गोष्ट आपण नेहमी ऐकतो, वाचतो, पण या गोष्टीचा दैनंदिन जगण्यामध्ये संबंध जोडणे व आपला अन्नदाता शेतकरी सुखी होईल असे पहाणे एकंदर परिस्थितीचा अभ्यास करता खूप गरजेचे आहे असे वाटते.