कुणकवण गावातील शेतमळे बहरत आहेत

    
|


Bhagirath - 1_1 &nbs          श्री. संतोष गोंधळेकर यांच्या ‘झोपले अजून माळं’ या पुस्तकामध्ये पाण्याची उपलब्धता व वापर यामधील व्यस्त प्रमाण विषद केले आहे. कुणकवण (ता. देवगड) गावाने हे प्रमाण सम करण्यासाठी ३ वर्षांपूर्वी नियोजन केले होते. त्याचे दृष्य परिणाम आत्ता गावामध्ये दिसत आहेत. या गावातील धरणावर १५
HP चा पंप व पाईपलाईनमुळे शेती करण्याच्या इच्छेला धुमारे आले आहेत. श्री. जितेंद्र कदम, श्री. आनंद ठाकूर-देसाई, श्री. अतिश गांगण, श्री. विशाल आडिवरेकर, श्री. गणेश मोरे, श्री. रुपेश राऊत, श्री. हरीश जनक, श्री. सचिन राणे या साऱ्यांच्या व महिला ग्रामसंघाच्या नियोजनातून गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर शेवगा, सुरण, झेंडू, पालेभाजी यांची प्रात्यक्षिके झाली. फायदा-तोट्याचा अंदाज आल्यानंतर प्लॅस्टिक मल्चिंग वापरून कलिंगड लागवडीचा विस्तारीत प्रयोग यावर्षी होत आहे. या साऱ्यातून २५ महिलांना रोजगार प्राप्त होत आहे. ‘श्रीधर (अण्णा) तावडे ग्रामविकास संस्था’ व ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ यांच्या हाकेला प्रतिसाद देणारे शेतकरी भविष्यामध्ये पाण्याचा उपयोग समृद्धीसाठी करणार आहेत.
Bhagirath - 2_1 &nbs