Enter your Email Address to subscribe to our newsletters
गोठोस गावातील श्री. प्रताप सरनोबत व वाडोस गावातील श्री. रत्नकांत चव्हाण या दोन शेतकऱ्यांनी ‘अंडी उबवणूक केंद्र’ सुरू केले आहे. या दोन्ही केंद्रांना चांगली आनुवंशिक गुण असणारी अंडी उबविण्यासाठी मिळावीत म्हणून ‘भगीरथ’ने प्रशिक्षणानंतर ४०० कावेरी जातीच्या कोंबड्या शेतकरी महिलांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ७५ नर व ३२५ माद्या आहेत. या दोन्ही अंडी उबवणूक केंद्रांना साधारणपणे वर्षभरामध्ये ६० हजार अंडी उबविण्यासाठी मिळतील.