गावराई गावात गाव विकास योजनेची सुरुवात

    
|


Bhagirath - 1_1 &nbs          छोट्या विकास प्रक्रियेमध्ये गावांना एकाचवेळी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज असते. सेंद्रिय शेती, SRI भात लागवड व बायोगॅस या तशा परस्परावलंबी गोष्टी आहेत. श्री. उदय नारळीकर (सरपंच, ग्रामपंचायत गावराई), श्री. सुनील वारंग (ग्रामसेवक, ग्रामपंचायत गावराई) व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची टीम यांनी काल १५ बायोगॅस बांधण्याचे नियोजन गावात केले. एका बायोगॅससाठी २०,०००/- रुपयांचे कर्ज सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक (शाखा सुकळवाड) देणार आहे. श्री. धनंजय गोळम (कृषी तज्ञ, वेंगुर्ला) यांनी SRI भातशेती प्रात्यक्षिक व पूर्वमशागतीसंबंधीची माहिती दिली. श्री. प्रफुल्ल वालावलकर (कृषी अधिकारी, पंचायत समिती कुडाळ), श्री. सखाराम सावंत व श्री. महादेव खरात (कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती कुडाळ) यांनी राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमाचे महत्त्व यावेळी विषद केले.

Bhagirath - 2_1 &nbs 
Bhagirath - 3_1 &nbs