सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जनशिक्षण संस्था यांच्या शिवणकाम प्रशिक्षणानंतर एकूण १५ महिला शिवणयंत्रासाठी बँकेकडून कर्ज घेणार आहेत. गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी भगीरथ प्रतिष्ठान ५०% अनुदानावर शिवणयंत्र देणार आहे. श्रीम. अंकिता लोट, श्रीम. वैशाली सावंत व श्रीम. सानिया तेली या तिघांची यासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.
मदत करत असताना महिलेचे सबलीकरण होईल याची काळजी भगीरथ घेते. ही मदत गरिबीसाठी नसते, तर तिच्या हातामध्ये असलेल्या कौशल्यामध्ये वृद्धी व्हावी, व यातून रोजगार निर्मिती व्हावी हा त्यामागचा हेतू आहे.