सेवा सहयोग पुणे यांच्या माध्यमातून एकूण ४०० विद्यार्थी – विद्यार्थीनींना शाळेच्या दप्तर वितरणाचा उपक्रम सुरु आहे. एकूण ३० कार्यकर्ते या उपक्रमामध्ये सहभागी आहेत.
गरीब व होतकरू मुलांसाठी हा मदतीचा हात खूप महत्त्वाचा ठरतो. येथे देणारा व घेणारा हे गट नाहीत. आपल्या समाजातील भावी पिढीचे शिक्षण अधिक सुखकर व्हावे यासाठी सहजपणे केलेली हि मदत आहे.