दुध व्यवसायातील गुणवत्ता वाढीसाठी अर्थसहाय्य योजना

    

   शेतकरी कुटुंबाला दुग्धव्यवसायापासून शाश्वत उत्पादनाचे साधन मिळते. आवळेगाव येथील पुर्वस दुग्धविकास संस्थेला भगीरथ प्रतिष्ठानने रुपये ३३,०००/- चे अर्थसहाय्य केले. एकूण रू. ४८,०००/- किंमतीची स्निग्ध पदार्थ व दुध (FAT/SNF) तपासणी यंत्रे संस्था खरेदी करणार आहे. अधिक शेतकरी लोकांनी दुध व्यवसाय करावा यासाठी UPNRM या नाबार्ड पुरस्कृत प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँक नवीन दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज देते.

   पुर्वस दुग्धविकास संस्थेला मदतीचा चेक देत असताना श्री. संतोष बाम, श्री. चंद्रकांत भगत, श्री. विकास धुरी, श्री. मुकेश ठाकूर. मदतीचा चेक स्वीकारताना संस्थेचे दुध व्यवसाय करणारे शेतकरी श्री. कमलाकर सावंत, श्री. रामचंद्र सावंत. भगीरथ प्रतिष्ठानने आतापर्यंत एकूण १० दुध संस्थाना अशा प्रकारची मदत केली आहे.