दुध डेअरीच्या यशस्वी उद्योगामुळे निवजे गावचे पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे

    
'भगिरथ प्रतिष्ठानच्या सहयोगाच्या माध्यमातून दुध डेअरीने निवजे गावचे पशुपालक आर्थिक स्वंयपुर्णतेकडे'
निवजे या गावातील दुध संकलन केंद्राचे सचिव श्री. अभय परब, त्यांचे सहकारी श्री. दत्तात्रय सावंत व श्री. संतोष पिंगुळकर (अध्यक्ष) यांनी गेल्या वर्षीचा पाठवलेला आर्थिक अहवाल सोबत आहे. -

11 मार्च 2018 रोजी श्री निवजेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, निवजे या दूध संकलन केंद्राची स्थापना झाली. याच महिन्यात म्हणजे 11 मार्च 2019 रोजी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. हे केंद्र चालू करण्यासाठी विशेष हातभार लागला तो भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचा. भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने केलेल्या मदतीमुळेच निवजे गावात दूध संकलन केंद्र सुरू होऊन त्याची घोडदौड यशस्वीरित्या सुरू आहे.

 

बरोबर एक वर्षापूर्वी गावात दुध संकलन केंद्र सुरु करण्याचा निवजे गावच्या मंडळींनी विचार केला परंतु फक्त विचार करून काही साध्य होत नाही त्यासाठी भांडवल लागते. भांडवल कसे उभे करावे हा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता त्यावेळी भगिरथ प्रतिष्ठान ही संस्था निवजे गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली. भगिरथ प्रतिष्ठानने हे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी रु. 35,000/- इतकी मोलाची मदत केली. त्यामुळेच हा दूध संकलन केंद्राचा आवाका पहिल्याच वर्षी नफा कमावत आहे.


श्री निवजेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, निवजे या संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त जाहीर झालेले काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणेः-

· संस्थेची स्थापना – दिनांक 11 मार्च 2018

· पहिल्या महिन्यात संकलन झालेले दूध – 2138 लिटर

· मागील महिन्यात संकलन झालेले दूध – 4720 लिटर

· वर्षभरात संकलन झालेले दूध – 37348 लिटर

· गोकुळ दूध संस्थेकडून जमा झालेले बिल – रु. 16,49,109/-

· संस्थेचा पहिल्या वर्षातील एकूण नफा – रु. 1,04,386/-

· सचिव व्यवस्थापन खर्च – रु. 45,157/-

· मशिन मेंटेनन्स, पशुखाद्य, गाडी व इतर खर्च – रु. 5529/-

· संस्थेचा एकूण खर्च – रु. 72,686/-

· संस्थेचा निव्वळ नफा – रु. 31,700/-

· भगिरथ प्रतिष्ठानने दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी दिलेले खेळते भांडवल – रु. 50,000/-

· वितरण झालेली रक्कम – रु. 25,000/-