स्वयंरोजगाराचा आयडॉल – श्री. अभय परब, गाव- निवजे

    
|

          श्री. अभय परब हा निवजे येथील तरुण शेतकरी कुक्कुटपालनामध्ये स्थिरावत आहे. कावेरी प्रजातीचा ५० नर व माद्या त्याचाकडे आहेत. ४ महिन्यामध्ये कोंबड्याचे वजन २.५ किलोचे झाले आहे. नियमितपणे ६ रु. दराने अंडी गावामध्येच खपत आहेत. काही प्रमाणामध्ये कंपनीचे संतुलित खाद्य व परसबागेतील मिळणारे खाद्य यातून उत्तम प्रकारची प्रथिने असलेली अंडी विक्रीतून होणारा फायदा रोजगाराचा नवीन मार्ग दाखवत आहे.

 

            श्री. अभय परब यांचाकडे मुऱ्हा जातीच्या म्हैस आहेत. गावातील दुध संकलन केंद्राचा सचिव म्हणून काम करताना स्वतःची भात शेतीही तो करतो. अशाच प्रकारचा प्रयोग आपण शाळेतील मुलांसाठी करत आहोत. एका विद्यार्थ्याला ५ सुधारित जातीच्या कोंबड्या प्रशिक्षणानंतर ‘भगीरथ’ देणार आहे. एकूण ५०० विद्यार्थ्यांसोबत हा प्रयोग केला जाईल.

The Model of Self employment

Abhay Parab, the young man from Nivaje is making his mark in poultry farming. He has 50 pairs of male and female chickens of the specie, Kaveri. The weight of a chicken has grown 2.5 kg within just 4 months. Eggs are sold at Rs. 6, quite regularly. Branded chicken feed and the feed in the backyard have resulted in eggs that have high-protein content. The profit from the sale of eggs has opened new avenues of employment.

Abhay also has buffaloes that belong to the Murha specie. He is the secretary of the milk collection centre in the village. He is also into rice farming. We at "Bhagirath" will be conducting a project with the school children. The students will be given 5 chickens after the poultry training. 500 students will be a part of the project.